Birthday wishes for sister in Marathi

 

Birthday wishes for sister in Marathi

बाबांची परी ती
अन सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट 
ही कविता आहे माझ्या ताईची

कधी चूक होता माझी
ताई बाजू माझी घेते
गोड गोड शब्द बोलून
शेवटी फटका पाठी देते



‘ताई’ शब्दातच आहे
माया प्रेमळ आईची
जन्मोजन्मा मज राहो
साथ माझ्या या ताईची
कवी – मयुर पाटील

आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या मायेला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
आपल्या घरची शान आहेस तू
तुझं हास्य म्हणजे घरात नांदणारं सुख
तुझं बोलणं म्हणजे सरस्वतीचं मुख
घरात लक्ष्मी नांदते तुझ्या रूपाने
तुझ्या पाठी जन्माला येण्याचे भाग्य दिलं आईबापाने
प्रेम आणि जिव्हाळा तुझ्याकडून मिळाला
उंदड आयुष्य लाभो जन्मोजन्मी तुला
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

प्रिय दीदी,
तुझं माझं नातं जरा खास आहे,
कारण तुझं माझ्या जीवनात वेगळं स्थान आहे
लहानपणी सगळ्यात जास्त भांडण झालं आपलं
म्हणूनच की काय सगळ्यात जास्त प्रेम पण एकमेकांवर आहे आपलं
न सांगता तू माझ्या मनातलं कन्फ्युजन ओळखते
जास्त लक्ष देऊ नकोस म्हणून कमी शब्दात छान  समजावते
तू बनवलेली साधी कोशिंबीर पण टेस्टी असते
म्हणून तर तूच बनवलेली पाणीपुरी सगळ्यांना हवी असते
तू सासरी जाताना पहिल्यांदा माझ्या जवळ रडली
कधीच व्यक्त न केलेलं प्रेम त्या दिवशी करून गेलीस
अशीच आनंदी राहा, सुखात राहा हिच आहे इच्छा
वाढदिवसाच्या तुला दीदी  खूप खूप शुभेच्छा
कवियित्री – नेहा खेडेकर



आईचे रूप जणू साक्षात मुर्ती देवाची
वडिलांच्या प्रत्येक आवाजाला जोड असते संस्कारांची
छोट्या भाऊ बहिणीला साथ मिळते घरभर मस्तीची
गुरूजन वर्गही त्यात भर टाकणार मोठ्या जीवनप्रवासाची
मित्र मैत्रिणी ओळख करून देणार नवनवीन गोष्टींची
मात्र या सर्वात
तुमच्याबरोबर भक्कम उभी राहणार ती जागा नेमकी मोठ्या बहिणीचा
कवि – कल्पेश कविता प्रमोद मढवी

बहीण म्हणजे आईचं रूप
बहीण म्हणजे प्रेम
बहीण म्हणजे आनंद
बहीण म्हणजे विश्वास
बहीण म्हणजे हसवणारी आणि रडवणारी
बहीण म्हणजे भावाचं मन राखणारी
बहीण म्हणजे सुखदुःखाची साथीदार
बहीण म्हणजे भावासाठी वेडी असणारी
बहीण म्हणजे मस्ती धमाल
बहीण म्हणजे कधी कधी डोक्यात जाणारी पण आयुष्यभर मनात असणारी
कवि – राजेश 

नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Birthday wishes for sister in Marathi, Sister birthday wishes in Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता 


Post a Comment

0 Comments