good night text in Marathi | शुभ रात्री सुविचार

 good night text in Marathi | शुभ रात्री सुविचार

आयुष्यात समजा आपण,
एखाद्या गोष्टीत हरलो तर,
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते,
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत,
जिंकण्याची इच्छा नसणं,
ही भावना जास्त भयंकर असते…
प्रयत्न करत रहा.
शुभ रात्री !

gn msg marathi

जर नशीब काही “चांगले” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते..
आणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते…!
शुभ रात्री !

कोणावर इतका भरोसा
ठेऊ नका कि,
स्वतःचा आत्मविश्वास,
कमी पडेल…
शुभ रात्री !

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

स्वप्न असं बघा,
जे तुमची झोप उडवून टाकेल..
आणि, एवढं यश मिळवण्याचा
प्रयत्न करा कि,
टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे…
शुभ रात्री !

वाघ जखमी झाला तरी,
तो आयुष्याला कंटाळत नाही..
तो थांबतो, वेळ जाऊ देतो,
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..
घेऊन, तीच दहशत.. अन तोच दरारा!!!
पराभवाने माणुस संपत नाही,
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो..
शुभ रात्री !

कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि,
“शर्यत अजुन संपलेली नाही.. कारण,
मी अजुन जिंकलेलो नाही…”
शुभ रात्री !

समुद्रातलं सगळं पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी
आत येऊ दिलं तर ते जहाज,
बुडवल्याशिवाय राहत नाही..
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही…
शुभ रात्री !

good night wishes in marathi

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण,
पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
आत्मविश्वास यशस्वी होण्याची
खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष
करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो…
शुभ रात्री !

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून
पार पडत नाही..
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात,
त्यांनाच यश प्राप्त होते…
शुभ रात्री !

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते,
परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते…
शुभ रात्री !

ठेच तर लागतच राहिल,
ती सहन करायची हिंमत ठेवा,
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या
माणसांची किंमत ठेवा…
शुभ रात्री !

नशिबाशी लढायला
मजा येत आहे मित्रांनो!
ते मला जिंकू देत नाही,
आणि मी हार मानत नाही…
शुभ रात्री !

Some sweet words also can be a treat for someone like good night massages Marathi, शुभ रात्री शुभेच्छा मराठी, शुभ राञी मराठी संदेश and wish in Marathi. Getting good night text in Marathi from dearest one can make smile and fill joy in anyone’s moment.

Post a Comment

0 Comments